NSS Special Camp Reporting

महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे
रा.से.यो. विशेष शिबीर अहवाल
१. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती व्दारा संचालित , महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वे च्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे “जल जागरण विशेष शिबीर” दिनांक ४ ते ११ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शिबीर दत्तक ग्राम टेंभुर्णी येथे संपन्न झाले, दत्तक ग्राम टेंभुर्णी यथील मंदोदरी नदीवर बंधारा या रा. से. यो. शिबिराचे उद्दिष्ट होते. दिनांक ४ फेब्रुवारी २०१८ शिबिरारथींचे दत्तक ग्रामात आगमन,शिबिरारथींची नोंदणी, गटा मध्ये स्वयंसेवीकांची विभागणी करून शिबिराच्या यशस्वीतेसाठी करण्यात आली.सायंकाळच्या सत्रात ग्रामस्थां सोबत चर्चा करून गावातील समस्या समजूनघेतल्या,
२. दिनांक ५/०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर ग्रामसफाई, परिसर स्वच्छता करण्यात आली , या मध्ये सर्व शिबिरार्थी सहभागी झाल्या होत्या.उद्घाटन समारंभाची पूर्व तयारी करण्यात आली. दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ ला दुपारी ४ वाजता उद्घाटन शिबिराचे उद्घाटन डॉ स्नेहल कानिचे यांचे शुभ हस्ते, महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. आर.एस.हावरे यांचे अध्यक्षतेखाली धनराज गडपायले , मुकुंद वडस्कर, श्री. बाला साहेब हरणे , सौ. संगीता घोडमारे, सौ. मालुताई मेश्राम , श्री. आशीष कनाके,सौ. भारतीताई वाघमारे, श्री. पिकू मेटकर , श्री. पंकज तायवाडे , श्री. प्रवीण आसोडे , श्री . अरुण शेळके, श्री. रावसाहेब शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . या वेळी महाविद्याल्याचे रा.से. यो. पथकाच्या स्वंयम सेविका , सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थितीत होते. उद्घाटन समारमभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले, संचालन कु. हिना हारुन शेख हिने केले तर आभार प्रदर्शन कुं.राधा गावंडे हिने केले, सर्व शिबिरार्थीनिनीचा सहभाग उलेखनीय होता.
३. दिनांक ६/०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर श्रमदानास प्रारंभ झाला, या मध्ये सर्व शिबिरार्थी , प्राचार्य डॉ.आर.एस.हावरे, प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे, डॉ. जी. एस.वेले, प्रा. एस. व्ही. भुयार , डॉ. अतुल वानखेडे, प्रा.एन. एस. सोळंके, धनराज गडपायले , मुकुंद वडस्कर, श्री. बाला साहेब हरणे, श्री. आशीष कनाके,सौ. भारतीताई वाघमारे, श्री. पिकू मेटकर , श्री. पंकज तायवाडे , श्री. प्रवीण आसोडे , श्री . अरुण शेळके, श्री. रावसाहेब शेळके व गावकरी मंडळी सहभागी झाले होतें. बौद्धिक सत्रात “महिला सक्षमीकरण , काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करण्यास मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत विघे, बी. एस. महाविद्यालय, परतवाडा, प्रा.डॉ. दीपक राउत, सरस्वती महाविद्यालय,दहिहंडा उपस्थितीत होतें तर अध्यक्ष स्थान डॉ.पी.पी.दंदे, महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे. यांनी भूषवले होतें. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठचे रा.से.यो.समन्वयक डॉ. मिरगे , श्री. राजेश पिदडी यांनी शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले .रात्री मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणात आले
४. दिनांक ७ /०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर श्रमदानास प्रारंभ झाला, या मध्ये सर्व शिबिरार्थी,प्राचार्य,कार्यक्रम अधिकारी,सर्व प्राध्यापक,गावकरी यांचा सहभाग लाभला.दंत तपासणी शिबीर साठी डेंटल कोलेज , अमरावती च्या सहयोगाने संपन्न झाले, जवळपास १०० रुग्णतपासणी या वेळी करण्यात आली.बौद्धिक सत्रात मार्गदर्शक म्हणून शेत माल प्रक्रिया उद्योग उद्योजिका सौ. कल्पना दिवे , प्रकल्प संचालिका, गोदावरी गृह उद्योग तलेगाव ठाकूर यांनी प्रा त्याकशिक द्वारे समजून सांगितले.या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ.वैशाली देशमुख, महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे यांनी भूषवले होतें. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले रात्री मनोरंजांतून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणात आले.
५. दिनांक ८ /०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर श्रमदानास प्रारंभ झाला, या मध्ये सर्व
शिबिरार्थी,प्राचार्य,कार्यक्रम अधिकारी,सर्व प्राध्यापक,गावकरी यांचा सहभाग लाभला.पशु तपासणी शिबिर मध्ये १८ पशु तपासणी करण्यात आली. डॉ. साधना आर. घुगे, डॉ.व्ही.एस.झोडपे, डॉ. पुंड, डॉ.बागडे, डॉ. शिरसाट ह्या चमूचे सहकार्य लाभले. बौद्धिक सत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ.प्यारेलाल सूर्यवंशी राजाभाउ देशमुख महाविद्यालय, नादगावखंदेश्वर , तर अध्यक्ष स्थान प्रा.एस.व्ही. भुयार महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे यांनी भूषवले होतें. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले. रात्री महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे भूगोल विभाग प्रमुख प्रा.एस.व्ही. भुयारयांच्या मार्गदर्शनात आकाश निरीक्षण कार्यक्रम पार पडला.
६. दिनांक ९/०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर श्रमदानास प्रारंभ झाला, या मध्ये सर्व शिबिरार्थी,प्राचार्य,कार्यक्रम अधिकारी,सर्व प्राध्यापक,गावकरी यांचा सहभाग लाभला. बौद्धिक सत्रात स्पर्धा परीक्षा यशाचा राज मार्ग या विषयावर मार्गदर्शक म्हणूनडॉ.दीपक शृंगारे, आदर्श महाविद्यालय,धामनगाव हे उपस्थितीत होतें तर अध्यक्ष स्थान प्रा.डॉ.एस.एस.जगताप,महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे यांनी भूषवले होतें. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले रात्री मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणात आले.
७. दिनांक १० /०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर श्रमदानास प्रारंभ झाला, या मध्ये सर्व
शिबिरार्थी,प्राचार्य,कार्यक्रम अधिकारी,सर्व प्राध्यापक,गावकरी यांचा सहभाग लाभला.दुपारच्या सत्रात महिला मेळाव्याचे आयोजन शिबिर स्थळी करण्यात आले होतें, या वेळी टेमभूरणी गावातील महिलांची उपस्थितीती उलेखनीय होती, या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. एस.एस.जगताप,महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चा. रे या उपस्थितीत होत्या, तर अध्यक्षस्थान प्रा.सौ.एम.एस. देशमुख यांनी भूषवले, अतिथी म्हणून प्रा.कु. नेहा इंगळे मंचावर उपस्थितीत होत्या, महिलाच्या समस्या, प्रश्न, अडचणी,बचत गट, संबंधी माहिती घेण्यात आली,मार्गदर्शनपर व्याखाने झाली, व मेळाव्याचे समापन झाले. बौद्धिक सत्रात “स्वच्छता दूत :गाडगे महाराज“ या विषयावर मार्गदर्शक म्हणून प्रा. अंबादास घुले महात्मा ज्योतिबा फुलेमहाविद्यालय,भातकुलीहे उपस्थितीत होतें तर अध्यक्ष स्थान प्रा.डॉ.गी.एस वेले,महिला कला वाणिज्य महाविद्यालय,चा.रे यांनी भूषवले होतें.या सत्रात महाविद्याल्याचे प्राचार्य आर. एस. हावरे, प्रा. डॉ.पंकज वानखडे, प्रा.डॉ. अण्णा वैद्य, नरस्मा महाविद्यालय, अमरावती हे मार्दर्शनासाठी उपस्थितीत होते. बौद्धिक सत्रात पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले. रात्री मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणात आले.
८. दिनांक ११ /०२/२०१८ ला सकाळी प्रार्थना, प्राणायाम, योगासन प्रभात फेरी नंतर ग्रामसफाई, परिसर स्वच्छता करण्यात आली , या मध्ये सर्व शिबिरार्थी सहभागी झाल्या होत्या.समारोप समारंभाची पूर्व तयारी करण्यात आली.दिनांक ११ फेब्रुवारी २०१८ ला दुपारी २ वाजता शिबिराच्या समारोप समारम्भ महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. आर.एस.हावरे यांचे अध्यक्षतेखाली धनराज गडपायले , मुकुंद वडस्कर, श्री. बाला साहेब हरणे , सौ. संगीता घोडमारे, सौ. मालुताई मेश्राम , श्री. आशीष कनाके,सौ. भारतीताई वाघमारे, श्री. पिकू मेटकर , श्री. पंकज तायवाडे , श्री. प्रवीण आसोडे , श्री . अरुण शेळके, श्री. रावसाहेब शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . या वेळी महाविद्याल्याचे रा.से. यो. पथकाच्या स्वंयम सेविका , सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थितीत होते. उद्घाटन समारमभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले, संचालन कु. निकिता देशमुख हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.व्ही.डी. कापसे यांनी केले,रा.से. यो. विशेष शिबिराचा अहवाल हु.रुपाली वेखंडे हिने केले, तर मनोगत कु,राधा गावान्द्व व शिरीन शेख यांनी व्यक्त केले. सर्व शिबिरार्थीनिनीचा सहभाग उलेखनीय होता.